सोज्वळ सावळ्या रंगात नटलेली
तू एक गझल आहेस
वाचताक्षणीच मनात पोचलेली
तू एक गझल आहेस
प्रसन्न विचारांसारखे केस आहेत मुक्त
हासिले गझल असे ते ओठ स्मित युक्त
हवी होतीस तेव्हा भेटलेली
दिसताच वसलेली
मनाला भावलेली
तू एक गझल आहेस
अर्थांचे अनेक झालर असलेली
तू एक गझल आहेस
डोळ्यात तुझ्या चमक आहे आत्मविश्वासाची
वृत्तीत तुझ्या लकब आहे जग जिंकायाची
मराठमोळा बाज असलेली
तू एक गझल आहेस
कितेक युगांनी सुचलेली
तू एक गझल आहेस