जगाला शेती शिकवणारा दुर्लक्षित नायक : डॉ.पांडुरंग खानखोजे
कृषिप्रधान भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंभू बनवणारे हरितक्रांतीचे जनक डॉ.स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच.असे अनेक रत्न या भारतभूमीत होऊन गेले आहेत.काळाच्या ओघात ते विस्मृतीत गेले असले तरी अशा प्रसंगी त्यांचा आठव होतो.डॉ.स्वामिनाथन यांनी ज्यांच्या पासून कृषीक्रांतीची प्रेरणा घेतली असे ते जगाला शेती शिकवणारे डॉ.पांडुरंग खानखोजे.मला वाटते ते देखील भारतरत्नाचे आधिकारी आहेत. मेक्सिकन कृषी क्रांतीचे जनक असणारे डॉ खानखोजे यांचा एक शेतमजुर ते मेक्सिकन कृषीक्रांतीचे जनक हा प्रवास विस्मयकारक आणि थक्क करणारा आहे. महान कृषी संशोधक महाराष्ट्र राज्य हे भारताच्या सांस्कृतिक , शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचे केंद्र राहिलेले आहे , या मातीने कित्येक क्रांतिकारक घडवले आहेत , पण या मातीत रुजून थेट अमेरिकेत कृषी क्रांती घडवून आणणाऱ्या डॉ पांडुरंग खानखोजे यांचे कार्य म्हणूनच कृषी इतिहासात क्रांतिकारक म्हणून अमर झाले आहे. पांडुरंग खानखोजे यांच्या बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे , मात्र लॅटिन अमेरिका आणि मेक्सिकोत यांना देवत्व प्राप्त झाले आहे. नुकताच मेक्सिकोतील ...