जगाला शेती शिकवणारा दुर्लक्षित नायक : डॉ.पांडुरंग खानखोजे

 कृषिप्रधान भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंभू बनवणारे हरितक्रांतीचे जनक डॉ.स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच.असे अनेक रत्न या भारतभूमीत होऊन गेले आहेत.काळाच्या ओघात ते विस्मृतीत गेले असले तरी अशा प्रसंगी त्यांचा आठव होतो.डॉ.स्वामिनाथन यांनी ज्यांच्या पासून कृषीक्रांतीची प्रेरणा घेतली असे ते जगाला शेती शिकवणारे डॉ.पांडुरंग खानखोजे.मला वाटते ते देखील भारतरत्नाचे आधिकारी आहेत. मेक्सिकन कृषी क्रांतीचे जनक असणारे डॉ खानखोजे यांचा एक शेतमजुर ते मेक्सिकन कृषीक्रांतीचे जनक हा प्रवास विस्मयकारक आणि थक्क करणारा आहे.

महान कृषी संशोधक 

महाराष्ट्र राज्य हे भारताच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचे केंद्र राहिलेले आहे, या मातीने कित्येक क्रांतिकारक घडवले आहेत, पण या मातीत रुजून थेट अमेरिकेत कृषी क्रांती घडवून आणणाऱ्या डॉ पांडुरंग खानखोजे यांचे कार्य म्हणूनच कृषी इतिहासात क्रांतिकारक म्हणून अमर झाले आहे.

पांडुरंग खानखोजे यांच्या बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, मात्र लॅटिन अमेरिका आणि मेक्सिकोत यांना देवत्व प्राप्त झाले आहे. नुकताच मेक्सिकोतील शापिंगो येथील नॅशनल अँग्रीकल्चरल स्कूल येथे त्याचा पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांच्या पुतळ्या खाली मेक्सिकन भाषेत लिहिलेल्या ओळी फार बोलक्या आहेत ; आता कोणीही गरीब भुकेने मरणार नाही ! 

या विधानावरून त्यांच्या कार्याची प्रतीची येते. 

संशोधक वृत्तीचे बीज 

पांडुरंग खानखोजे यांचा जन्म वर्धा येथील पलकवाडी या लहानशा खेड्यात झाला, त्याचे वडील सदाशिव खानखोजे हे ब्रिटिश न्यायालयात मध्ये पीटिशन राईटर होते, ब्रिटिश काळात सर्वसामान्य भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अर्ज लिहून देण्याचे काम ते करत. पांडुरंग यांचे आजोबा व्यंकटेश खानखोजे सुद्धा १८५७ स्वातंत्र्य स्मरत सामील होते. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांच्या क्रांती कारण आयुष्याची सुरुवात होती असे म्हणता येईल. पांडुरंग यांनी प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण हे नागपूर येथील नील हायस्कूल मध्ये केले. माध्यमिक शाळेत असताना त्यांचा संबंध सर्वप्रथम बांधव समाज या सामजिक चळवळी सोबत आला. या माध्यमातून त्यांनी १८९९ मध्ये आलेल्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित केले होते. या दरम्यान पांडुरंग यांची कृषी क्षेत्रात ज्ञान लालसा वाढली होती. दुष्काळ का पडतो, तो कसा दूर करता येईल, याबद्दल प्रश्न त्यांना पडत होते. 

क्रांतीचा वसा आणि ठसा 

यावेळी देशात ब्रिटिश विरोधी वातावरण तयार झाले होते आणि स्वातंत्र्य चळवळ वेग घेत होती देशातील सशस्त्र क्रांतीच्या विचारांनी भारावून गेलेले तरुण पांडुरंग यांनी याच काळात छिदवडा येथील गोंड आदिवासी समाजाची बाजू घेऊन ब्रिटिश दडपशाही विरुद्ध मिळून बंड पुकारले, मात्र हे बंड फसले, आणि पांडूरंग यांना भूमिगत व्हावे लागले, पांडुरंग यांचे नाव ब्रिटीश सरकारने काळ्या यादीत टाकले, या कारणाने पांडूरंग हे प्रथमच चर्चेत आले. आणि त्यांचा संबंध मग देशभरातील विविध संघटना आणि जहाल क्रांतीकारकांशी आला. यावेळी त्यांची भेट ही लोकमान्य टिळकांशीही झाल्याची माहिती मिळते. तसेच स्वातंत्र्य विर सावरकर यांच्याशी त्यांनी पत्र व्यवहार केला होता. भुमिगत असतानाच सशस्त्र क्रांतीच्या दिशेने पांडूरंग हे जपान मध्ये गेले. तेथे युद्ध शास्त्र आणि सैनिकी प्रशिक्षण घेण्याच्या त्यांचा विचार होता. मात्र त्यांचा पदरी या बाबतीत निराशाच आली, यावेळी

मेक्सिको : मजूर ते प्रोफेसर 

१९०६ साली सेन फ्रान्सस्को हे अमेरिकेतील एक शहर भूकंपाने बेचिराख झाले होते.या शहराच्या पुनर्बांधणी साठी जगभरातून मजूर जाणार होते. अश्याच एका जहाजात संधीच्या शोधात पांडूरंग अमेरिकेत पोहोचले, सुरुवातीला ओळकीचे कुणी नसल्याने खानखोजे यांनी येथे शेत मजुरी करून आपली उपजीविका चालवली. अमेरिकेतील वास्तव्यात १९११ साली पांडूरंग यांनी 25 व्या वर्षी ओरेगॉन येथील कृषी विद्यापीठात प्रवेश मिळवत बी एसी अग्री पदवी मिळवली. पुढे १९१३ साली एमएससी पदवी मिळवत वॉशिंगटनमधील स्टेट कृषी महाविद्यालयात नोकरी पत्करली, यावेळी त्यांची ओळख ही प्रसिद्ध वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याशी झाली. त्यामुळे शेतकरी समाजाला उपयुक्त अशा कृषिकार्याचं महत्त्व त्यांच्या मनावर ठसलं. म्हणून पुढचं शेतीविषयक शिक्षण त्यांनी चालूच ठेवलं. मिनेसोटा विद्यापीठातून १९१९ साली त्यांना कृषी शास्त्रातील डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी मिळाली. या पीएच.डी. पदवीसाठी त्यांनी गव्हावर सखोल संशोधन केलं होत. पिचडी संशोधन पुर्ण केल्यावर नंतर काही वर्ष डॉ. पांडुरंग यांनी मेक्सिकोमधील राष्ट्रीय कृषी विद्यापीठाच्या कृषी रसायन प्रयोगशाळेत काम केले. यावेळी स्थानिक मळेवाले आणि शेतकऱ्यांचे माती परीक्षणाचे अहवाल बनवण्याचे काम तेथे चालत असे, यावेळी त्यांचा तेथील शेतकऱ्यांशी जवळून संबंध आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी समजण्यास मदत झाली. दरम्यान त्यांनी स्थानिक मेक्सिकन भाषा शिकून घेतली. मेक्सिकोत तेव्हा मका हे मुख्य पीक होते, खानखोजेंनी संशोधनासाठी मका या पिकाची निवड केली. त्याच्या संशोधनाचे अहवाल सोनोरा येथील राष्ट्रीय संशोधन परिषदेत सादर केले यावेळी त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यांची दखल घेत १९१९ साली त्यांना महाविद्यालयांत अध्यापनाचे आणि संशोधनाचे काम मिळाले. 

सुधारकी संशोधक 

यावेळी विद्यापीठातील कृषी सुधार प्रकल्पअंतर्ग्रत मेक्सिकोत अभ्यास दौरे काढले, स्थानिक शेतकरी आणि मळेवाल्याकडून त्याच्या समस्त्यांया स्वरूप जाणून घेतले आणि गहू आणि मका याचे सुधारित वाण तयार करण्याच्या संशोधन प्रारंभ केला त्यामध्ये पावसाळी व उन्हाळी हंगामात अधिक उत्पादक देणारे वाण,तसेच गव्हावर पडनाऱ्या तांबेर्‍याला प्रतिबंध करणारं वाण, बर्फाळ प्रदेशातही टिकून राहणारं कणखर वाण, कोरडवाहू जमिनीत टिकणारं वाण, उंच डोंगरातल्या शेतात पिकू शकणारं वाण अशा विविध गुणधर्माची प्रजाती त्यांनी विकसित केल्या. यामध्ये "टिओझिंटे" या मक्याच्या मुळ जंगली प्रकारच्या गवताशी घडवून आणत संशोधित अधिक उत्पादन देणारी आणि टपोऱ्या दाण्याचे मकाच्या वाण विकसित केले. पुढे डॉ.खानखोजे यांनी तीस मोफत मेक्सिकोत सुदूर भागात कृषी शाळा उघडल्या, आपल्या खाजगी मिळकतीतून प्रथम मेक्सिकोत जमिनी खरेदी करायच्या आणि त्या गरजू शेतकर्‍यांना वाटून टाकायचा सपाटा चालवला. जगाचे पोषण करण्यासाठी त्यांचे मानवतावादी आदर्श स्वप्नं त्यांनी पूर्ण केले.

भारतभूमीत परत ; गांधीजींच्या सहवासात 

१९०६ ते १९४९अशी ४३ वर्ष मेक्सिकोत राहून तेथील कृषी आणि सामाजिक सुधार कार्यात वाहून घेतल्यावर त्यांनी भारत स्वतंत्र झाल्याचे समजताच भारतात येण्याची इचछा व्यक्त केली, त्यांनतर मध्य प्रदेशचे कृषी मंत्री रा कृ पाटील यांनी त्यांनी कृषिसुधार समितीचं काम करण्यासाठी खानखोजेंना निमंत्रित केलं. मात्र एप्रिल 1949मध्ये परतल्यावरही त्यांना मुंबईच्या पोलिसांनी अटक केली, कारण ब्रिटिशांनी तयार केलेल्या काळ्या यादीत त्यांचं नाव अजूनही होतं. परंतु योग्य शासकीय छाननी होऊन त्यांना मुक्त केलं गेलं, भारतात आल्यावर डॉ पांडुरंग खानखोजेंना महात्मा गांधींच्या प्रेरणेने ग्रामसुधाराची ओढ लागली होती. म्हणून त्यांनी ‘मुक्तग्राम’ चळवळीचा एक आराखडा तयार केला. आकाशवाणीवरून शेतक् री मंडळीसाठी दरमहा व्याख्यानं देण्यासाठी कामगिरी दिली. १९५६ ते १९६४ पर्यंत त्यांनी ऐंशी व्याख्यानं दिली. याकाळात पांडूरंग ग्रामीण भागात वास्तव्यास होते. जगभर हरितक्रांती करणाऱ्या या संशोधकाचे नागपूर येथे १९६७ मध्ये झोपेत असतानाच वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

दुर्लक्षित नायक 

मेक्सिको देश त्यावेळी नुकताच १९१० च्या क्रांतीनंतर वसाहतवादाच्या बेड्या झटकून तरुण आणि प्रजासत्ताक बनण्याचा प्रयत्न करीत होता. या देशाच्या निर्माण अवस्थतेत मेक्सिको कला, वैज्ञानिक विकास आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात होते. या प्रवासात या देशाची साथ दिली ती सातासमुद्रापार राहणाऱ्या डॉ पांडुरंग खानखोजे यांनी, तेही सदैव त्यांनी तेथे नवीन प्रगतीचा आणि विकासाचा आणि वैज्ञानिक क्रांतीने नव्या जगाचा झेंडा फडकावला. पांडुरंग खानखोजे अनेक कष्ट, उपासमार आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अखंड इच्छेनंतर आपल्या जुन्या क्रांतिकारक मित्रांच्या मदतीसाठी मेक्सिकोला पोहोचले. त्यावेळी ब्रिटिशांच्या तावडीत सापडले असते तर त्यांना कदाचित फाशीची शिक्षा भोगावी लागली असती. अमेरिकेतील तरुण गदर क्रांतिकारकांच्या प्रेरणा आणि प्रशिक्षणात सहभाग घेत असताना मेक्सिकन लोकांनी त्याच्याशी मैत्री केली होती. मेक्सिकोने खानखोजेंना मनापासून स्वीकारले, देश, धर्म, भाषा कुठलाही असो भुकेची प्रेरणा आपली सर्वांची सारखीच असते. हे फार विशेष आहे कि भारतात १९६६ साली भारतात हरितक्रांती साठी जेव्हा नॉर्मन बोरलॉग आणि एमएस स्वामीनाथन यांनी भारतातील हरित क्रांतीसाठी सांशोधन करण्यासाठी,मेक्सिकोमधील सोनोरा येथील संशोधन संस्थेची निवड केली होती, याच प्रयोगशाळेत पांडुरंग यांनी मूलभूत संशोधन केले होते.

नजीकच्या भविष्यकाळात खानखोजे यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन वर्धा येथे, पांडूरंग खानखोजे कृषी विद्यापीठ स्थापन करावे. आज भारत कृषी उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे त्याचे श्रेय खानखोजे यांना जाते.अर्थात आपल्याकडे खऱ्या हिऱ्याची पारख आणि किंमत क्वचितच होते.खानखोजे असेच दुर्लक्षित नायक आहेत.

Comments

Popular posts from this blog

About

How to write a winning SOP - Statement of purpose for Internship/Foreign University/PhD Application