Saturday, 18 July 2020

गणोबा

मी आठवीत असतानाची गोष्ट असेल. आमच्या batch मधून 4 विद्यार्थी NTSE mains साठी सिलेक्ट झालो होतो. (ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा असून दहावी शिक्षण पूर्ण होईपर्यंत केंद्र सरकारची स्कॉलरशिप मिळते.)

त्या तीन जणांमध्ये मी ही होतो. आमची वेगळी शिकवणी असायचो. त्यावेळी गणित शिकवणारे जे सर होते ते मला मागील दोन वर्षांपासून ओळखत होते. त्यामुळे त्यांना माझ्या स्वभावाची कल्पना होती. 

गणित..कध्धी म्हणजे कध्धीच आवडलं नाही मला! म्हणजे मार्क कमी मिळायचेच पेपरात भोपळे मिळायचे असं काही नाही बरं का.. पण गणित म्हटलं की कंटाळाच यायचा.. अगदी पाचवी-सहावीत असल्यापासूनच... माझे काही मित्र अगदी हिरीरीने अल्जेब्रा / भूमितीतली प्रमेय सोडवत बसलेले असायचे, आणि माझं लक्ष गणिताच्या तासाला कायम वर्गाच्या बाहेर खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यावर, झाडांवर, पक्ष्यांवर असायचं!! या रुक्षपणात इतकं रंगून जाण्यासारखं काय आहे? हे कोडं मला कधीच उलगडलं नाही...पण शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी वगैरेंना माझी कधीच दया आली नाही..!! आणि वर्गमुळं, घनमुळं, परिमिती, त्रिज्या, चक्रवाढ व्याज अशा भीतीदायक शब्दांची आक्रमणं माझ्या कोमल मनाला घायाळ घायाळ करत राहिली..
दोन दोन मुलांची एक जोडी.. आणि नेमका मी होतो गणिताच्या प्रचंड वेड्या आणि आमच्या शाळेतल्या सगळ्यात हुशार मुलासोबत ( आज महाशय IIT-Madras ला पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत) त्याला काहीही यायचं इयत्ता सातवीत... 
मला भयचकित व्हायला व्हायच.. माझं मन त्याच्याविषयीच्या अत्यादराने आणि स्वतःविषयीच्या आत्यंतिक न्यूनगंडाने भरून आलं!

सिलिंडरचे volume काढण्याचा फॉर्म्युला वापरून एक गणित सोडवायचे होते. मी फॉर्म्युला वहीत लिहिल्यावर सर म्हणाले हा फॉर्म्युला चुकीचा आहे. Square नसून Cube आहे (मला ते सगळे एकसमान वाटायचे)  सरांनी सांगितलेलं चुकीचं कसं असेल, असा विचार करून मी लगेच फॉर्म्युला बदलला. 

उरलेले दोघे प्रश्नार्थक बघत होते कारण त्यांनीही Square असलेलाच फॉर्म्युला लिहिला होता. पण सरांना उलटप्रश्न विचारण्याची कुणी हिंमत करेना. शेवटी सर हसले आणि म्हणाले "तुम्ही इतका लवकर विश्वास कसा ठेवू शकता कुणावर? या विषयाचा वर्षभर तुम्ही स्वतः अभ्यास केलाय  आणि मी सांगतोय म्हणून लगेच स्वतःच्या ज्ञानावर बोळा फिरवणार का? असा पटकन विश्वास ठेवायचा नसतो. उद्या मी काही सांगेन किंवा तुमचे पालक काही सांगतील म्हणून तुम्हाला माहिती असलेली बरोबर गोष्ट सोडून चुकीची गोष्ट स्वीकारायची नाही."
 
हा प्रसंग आजही तितकाच ठळक लक्षात आहे. स्वतःचं ज्ञान आणि त्या ज्ञानातून आलेलं मत हे इतर कशापेक्षाही लाखमोलाचं असतं. वय आणि अनुभवाचा आदर जरूर करावा, पण त्याला पूर्णतः किंवा अंशतः submit करुन आपलं ज्ञान हे कधीही biased आणि प्रदूषित करून घेऊ नये. 

To the world of free knowledge and free opinions!

गणिताशी आता तसा काही संबंध नाही.. पण नात्यांमधली प्रमेय, आयुष्यातली कठीण गणितं सोडवायला वरच्या सुविचाराचा फॉर्म्युला मला करेक्ट कळून आलाय 


PS : ती स्कॉलरशिप नंतर मला मिळाली आणि मी खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी झालो, या दोन्हीचं श्रेय सरांना जातं. 😇

2 comments:

Shriram Kumawat said...

मस्त👌

Aalu said...

Hahahhahah awesome..same as me..but i never got scholarships����

जगाला शेती शिकवणारा दुर्लक्षित नायक : डॉ.पांडुरंग खानखोजे

  कृषिप्रधान भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंभू बनवणारे हरितक्रांतीचे जनक डॉ.स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच.असे अ...