वर्गात आल्या बाई मोठ्या घाईने
म्हणाली लिहा कविता डोक्याने ...
निळा आंबा पांढरा पेरू
खाऊन पोट भरिले,
लिहिलं आमच्या गोप्याने,
हे ऐकून सारे हसले, म्हणाले काय लिहिले हे मुर्खाने ...
“अरे मुर्खा, आंबा हा पिवळाच पेरू हे हिरवंच ”
म्हणाली बाई रागाने
“ का ? हे असंच का ? तसं का नाही ? ”
विचारलं त्याने हट्टाने
म्हणाल्या बाई ,
म्हणाल्या बाई ,
“ हे असंच लिहिलंस,तरच पास होशील चांगल्या मार्काने ”
खरं तर त्यादिवशी कल्पनाशक्तीचा खून झाला
खरं तर त्यादिवशी कल्पनाशक्तीचा खून झाला
कोणाच्या तरी हाताने .....
चित्रकलेच्या तासाला सर आले विषयाला
चित्रकलेच्या तासाला सर आले विषयाला
म्हणाले काढा चित्र मनाने
त्रिकोणी सूर्य,उडणारे मासे, सहा पायी हत्ती,
त्रिकोणी सूर्य,उडणारे मासे, सहा पायी हत्ती,
मस्त सृष्टी रंगवली गोप्याने
हे बघून सारे हसले
हे बघून सारे हसले
म्हणाले पुन्हा माती खाल्ली ह्या मुर्खाने...
“अरे बावळट,सूर्य गोलंच,मासे पाण्यातच, हत्तीला चारच पाय ”
म्हणाले सर रागाने
“कोणी सांगितला ? माझ्या चित्रात हे असंच ”
म्हणाला गोप्या जिद्दीने
हात पुढे करताच बसले दोन फटके सरांच्या पट्टीने
कल्पनाशक्तीचा खुन झाला,कोणाच्या तरी हाताने .....
दहा वर्षनंतर..
“ अरे गोप्या तू ? काय चाललंय सध्या ? ”
विचारलं त्यांनी आपुलकीने
“ काय चालणार ? तीच दहा हजारची नोकरी ,
तेच पत्र्याच घर त्याला नहीं छप्पर”
“ काय चालणार ? तीच दहा हजारची नोकरी ,
तेच पत्र्याच घर त्याला नहीं छप्पर”
म्हणाला गोप्या खजीलपणे..
“ अरे अरे अरे ! काय हे गोप्या ? काय चाललंय हे ?
थिंक औट ऑफ द बॉक्स , वापर कल्पनाशक्ती , आणि मार भरारी आयुष्यात ”
थिंक औट ऑफ द बॉक्स , वापर कल्पनाशक्ती , आणि मार भरारी आयुष्यात ”
म्हणाली बाई उत्साहाने हृदय भरून आले ,
केविलवाणे शब्द फुटले..
“ वापरली असती बाई, खरंच वापरली असती,
पण तिचाच तर खून झालाता कोणाच्या तरी हाताने..
संपत नाही शक्ती गोप्या सांगितले thermodynamic
ने सर बोलले पुढाकाराने
आनंद घे जगाचा तुझ्यामधल्या गुणाने
गोप्या उठतो निर्धाराने काहीतरी करण्याच्या उर्मिने
गोप्या उठतो निर्धाराने काहीतरी करण्याच्या उर्मिने
कल्पनाशक्तिचा खून झालता कोणाच्या तरी हाताने ”.
No comments:
Post a Comment