" आणि एका हळव्या क्षणी तो तिला म्हणाला,”माझं प्रेम आहे तुझ्यावर...
”ती काहीच बोलली नाही.त्याला ती शांतता खायला लागली,
म्हणाला बोल ना काहीतरी.अशी शांत नको राहूस,
नकार दे हवा तर पण बोल.
तिने त्याचा हात हातात घेतला,म्हणाली,
”माझं प्रेम नाही आहे तुझ्यावर.पण मित्र म्हणून तू हवा आहेस.राहशील कायम तसाच जसा आता आहेस?”
त्याच्या मनात आलं,माझ्या कपाळावर काय “c” लिहिलंय का,
की मी एवढा मूर्ख वाटतो हिला.”प्रेम नाही पण मित्र म्हणून रहा”
साला typical line चिकटवून दिली तोंडावर
.या पोरींना मुलं फक्त खेळवायला हवीत.हा पण हवा तो पण हवा,
या safe zone मध्ये game करणार आपला.
तो काहीच बोलला नाही.तिथून निघून गेला.
ती क्षणभर पहात राहिली त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे.टेबलवर दोन्ही हातांची घडी घातली.त्यावर डोकं ठेवलं.आणि डोळे बंद करून शांत बसून राहिली.
प्रियकर मिळेल.सहज मिळेल रे.ज्याला ऐकवायचं असेल भेटल्यावर त्याच्या मनात असलेलं सगळं सगळं.ज्याला त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे व्यक्त करायला स्पर्श करण्याची मुभा असेल.तो ते तसं व्यक्तही करेल.पण त्याला जमणार नाही खांद्यावर ठेवलेल्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला.तो पाहील जेंव्हा डोळ्यात तेव्हा त्याला प्रेम दिसेल.पण खोल डोळ्यात उतरून त्याला जमणार नाही काठावर असलेली ओल झिरपून टाकायला.
“कधीतरीच भेटतेस ,अशी रडत नको भेटू.”
त्याला हवा मोगऱ्याचा सुगंध.त्याला हवा त्याच्या मनाला रिझवणारा सुंदर हसरा चेहरा.आधीच प्रचंड व्याप आणि ताप असलेल्या त्याला नको असते प्रेयसीने केलेली “भावनांची फालतुगिरी”...मग “ती” आतल्या आत साचत जाते....
ती म्हणते मला तू मित्र म्हणून हवा आहेस,तेव्हा तुझ्याही खांद्यावर डोकं ठेऊन ती रडणार नसते रे २४ तास.तिला हवा असतो फक्त तो “मायेचा स्पर्श”.”मी आहे ऐकायला..तू बोल.”हे सांगणारा आश्वासक शब्द!ती म्हणते ,”मला तू मित्र म्हणून हवा आहेस” तेव्हा विश्वासाचा एक प्रचंड हळवा कोपरा,जो तिच्या प्रियकरालाही जमणार नसतो बाप जन्मात घ्यायला...ती तुला सुपूर्द करत असते.
एखादा romantic स्पर्श ,आणि ती देऊन टाकेल तिचं शरीर,पण तिच्या मनापर्यंत पोचण्याचा मार्ग मात्र नेहमीच बिकट असतो..आहे !
ती म्हणते,”तू मित्र म्हणून हवा आहेस!”..तेव्हा ती तिच्यातल्या “ती” ला सुपूर्द करत असते.
बघ,यावेळी कोणी म्हणाली,”मला तू मित्र म्हणून हवा आहेस !”...तर पुन्हा विचार कर...निघून जाण्याआधी ...
No comments:
Post a Comment