Wednesday, 29 June 2016

दोष नाही

शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही,
वेळ होती ओहटीची सागराचा दोष नाही.

छेडल्या तारा तरीही सूर नाही वाजले,
का फुलाच्या लाजण्याने हात माझे भाजले.
हात होते छेडणारे तो फुलाचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II१II

आरशांचा खेळ होता; सावल्यांचे हासणे,
दूध माझ्या भावनांचे साखरेने नासणे.
भूल होती; भास होता; भावनांचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II२II

चूक होते प्रश्न ते की चूक होती वेळ का?,
पावलांचा चालण्याशी बैसला ना मेळ का?
पावलांची चूक होती चालण्याचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II३II

बांधुनी डोळे कसा गं घेतला तू फैसला;
रेशमाशी गुंतताना गुंफला मी कोसला.
हा किड्याचा कोष होता रेशमाचा दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II४II

वेदनांच्या पावसाने आज माती भाजली;
दोन डोळ्यांना तुझ्या गं आसवे मी पाजली.
दोष नाही आज माझा हा तुझा ही दोष नाही.
शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही II५II

Saturday, 25 June 2016

एक सुंदर संध्याकाळ



ना जाणे क्यु ....... 




संध्याकाळची वेळ, काम करून करून कंटाळा आलेला, थोडासा fresh व्हावं म्हणून गरमागरम चहा चा cup घेऊन खिडकीत आलो. बाहेर काळेकुट्ट ढग दाटून आलेले. आता थोड्याच वेळात पाऊस पडेल हे सांगायला वेधशाळेची गरज नव्हती. काळ्याकुट्ट ढगांच्या साम्राज्याने अस्ताला जाणारा सूर्यही झाकोळला. त्या ढगांची वर आकाशात झालेली गर्दी उदासीनता आणून गेली आणि मनात अनेक विचारांनी गर्दी केली. विचार सहाजीकच “ती” च्या बद्दलचे.
काय विचार? विचार कसले प्रश्नच नुसते.. काय करत असेल ती? ती पण अत्ता चहा घेत अशीच खिडकीत बसली असेल का? तिकडेही असच वातावरण असेल का? असे एक न अनेक प्रश्न. पण का विचार करतंय मन या सगळ्याचा? काय उपयोग आहे याचा? पण उत्तरं कुठेच नाहीत. फक्त प्रश्न. विचारांच्या तंद्रीत चहा चा cup तसाच हातात. इतक्यात पाउस सुरु होतो. दुपारच्या उन्हात तापालेल्या धरतीवर पावसाचे थंडगार थेंब पडतात आणि धरतीमातेला एकदम शांत करून जातात. ओल्या मातीचा सुगंध साऱ्या वातावरणात पसरतो. त्या सुगंधाने मन थोडं हलकं होतं पण मनातलं वादळ काही क्षमत नाही.
इतक्यात  व्हाट्सअँप आयकॉन वाजतो आणि मनात चाललेल्या विचारांची शृंखला तुटते. आत्ता कोणाचा message असेल?
“ती”चाच तर नसेल ना? आणि काय आश्चर्य, “ती”चाच message. Message ऐकला  आणि सगळा mood च बदलला. पाहिल्या पावसानंतर वाळलेल्या झाडांना जशी नवी पालवी फुटते तसाच काहीसं. मनावर दाटलेलं मळभ एकदम क्षणार्धात नाहीसं झालं. असं होतं तरी काय त्या मेसेज मध्ये?
तर २२ सेकंदाच  गाणं  एक ऑडिओ  क्लिप 
 ''ना  जाणे  क्यु  होता  है  जिंदगी के साथ,
 ना अचानक  ये  मन , किसी  के  जाणे  के  बाद ,
करे  फार उसकी  याद 
छोटी  छोटी  सी  बात ...
 ना जाणे क्यू  ... "

नवल ,म्हणजे  हे  गीत  तिने  स्वतःच्या  आवाजात  रेकॉर्ड  करून पाठवलं  होत ,
 एखाद्या जादुगाराने जादूची कांडी फिरवावी ना तशीच जादू झाली काहीतरी. मन अपोआप शांत झालं. एव्हाना पाऊसही थांबलेला. आकाशातला काळ्या ढगांचा साम्राज्य अस्ताला गेलं आणि मावळत्या सूर्याच्या तांबूस प्रकाशात सुंदर असं इंद्रधनुष्य सायंकाळची शोभा वाढवू लागलं. जणू शांत झालेल्या मनाचं प्रतिबिंबच आकाशाच्या canvas वर उमटलं.
अझुनही हातात चहा चा cup तसाच होता. चहा एकदम गारेगार झालेला. एरव्ही असा चहा प्यायची इच्छाही झाली नसती पण आज मात्र जादूच अशी झालेली की गारढोण झालेला चहाही अमृतासारखा गोड लागू लागला.आणि  तीच  क्लिप  मी परत  परत  ऐकू लागलो  एका मेसेज ने किती मोठा बदल घडवून आणला. किती वेडं असतं माणसाचं मन. फार शुल्लक गोष्टींवरून दुखी होतं तर तशाच शुल्लक गोष्टींवरून खुश पण. फार अपेक्षा नसतात मनाच्या, पण माणसं अशाच छोट्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करतात आणि मग निर्माण होतो दुरावा. अशीच एक शुल्लक अपेक्षा पूर्ण झाली आणि सगळा मूड च बदलला.
हातातला चहा चा cup रिकामा झाला आणि कामाची आठवण आली. आकाशाच्या canvas वर इंद्रधनुच्या सुंदर रंगछटा रेखाटून सूर्यही अस्ताला गेलेला. मग मीही उठलो आणि कामाकडे परतलो..!!!




तळटीप १: पूर्वी मी अशीच एक पोस्ट लिहिली तेव्हा अनेकांनी मला “ती” बद्दल विचारलं. त्यांना मला एक  dialog ऐकवावासा वाटतोय, “एखादी गोष्ट / कविता लिहिताना ते सगळा अनुभावावंच लागतं असं काही  नाही, काही गोष्टी कल्पनेतूनही अवतरतात.”

Tuesday, 31 May 2016

प्रेम कुणावर....


सकाळी उठल्यावर जिची/ज्याची आठवण येते 
तिच्या/त्याच्या वर आपण प्रेम करतो....

भांडून देखील जिचा/ज्याचा राग येत नाही
तिच्या/त्याच्या वर आपण प्रेम करतो....

जिच्या कुशीत गेल्यावर जगातली सगळी 
टेन्शन विसरतो तिच्यावर आपण प्रेम करतो...

जिच्या/ज्याच्या चुकांवर आपण रागावतो 
मग एकांतात हसतो तिच्यावर आपण प्रेम करतो..

बाहेर गेल्यावर जिचे/ज्याचे भास सतावतात 
त्याच्यावर /तिच्या आपण खर प्रेम करतो ....

कधी सहज विनोद झाल्यावर आपला सहज लक्ष जात तिच्या/त्याच्या वर आपण खरं प्रेम करतो..

जिची/ज्याची आठवण आल्यावर एक छोटीशी 
स्माईल गालावर येते,(अगदी तशीच आरशात पाहू नका)तिच्यावर आपण प्रेम करतो...

हि कविता वाचताना देखील जिचा/ज्याचा 
विचार चमकून जातो त्याच्यावर आपण प्रेम करतो..

What I,ve learn

*What I have Learn....*

I have learned lot these past few years...
Through my fake smiles and unseen tears...

That, friends sometimes aren't forever 
that true love doesn't always last ....

Happy memories stay with youbut those happy moments go by fast...

Words can cut deeper than any sword...
Leaving you with something
That no man could replace or ever afford....

Sometimes things happen,
Sometimes your heart will break 
Though to feel real happiness

This is what's at stake in order to have the comfort of heaven

Your story to live to tell You must also experience the hate-filled life of hell 
Remember . . .

There will always be someone there Someone that honestly does care

 Person can leave your life 
Leave you alone
with your worries and strife
But like pain,the love you once
felt cannot from your body depart
but only may enter your heart 

Trying everything they can to help you 
Still you sit there unknowing and blind To what soon you'll be glad to find....

-Tahakik RR

Thursday, 26 May 2016

विटाळ होतो स्त्रित्वाचा.!!??

विटाळ होतो स्त्रीत्वाचा हो ज्या देवाला
स्वत:च त्याने घालावे मग मुल जन्माला

अभिषेकाची धार तुझ्यावर दगड तरी ‘तू’ !
शिंतोड्यांनी फुटे पालवी भिंताडाला ..

मनी कुणाच्या नकोच आता जागा मजला
मीच शोधले आहे माझ्या अढळ ध्रुवाला

अहंकार अन मत्सर म्हणजे तुझे सोयरे
किती त-हेने सजवतात अपुल्या नात्याला

विटाळ होतो स्त्रीत्वाचा हो ज्या देवाला
स्वत:च त्याने घालावे मग मुल जन्माला

अभिषेकाची धार तुझ्यावर दगड तरी ‘तू’ !
शिंतोड्यांनी फुटे पालवी भिंताडाला ..

मनी कुणाच्या नकोच आता जागा मजला
मीच शोधले आहे माझ्या अढळ ध्रुवाला

अहंकार अन मत्सर म्हणजे तुझे सोयरे
किती त-हेने सजवतात अपुल्या नात्याला

शोध अता तू हात नवा जोडण्यासाठी
धार विचारांची आली माझ्या हाताला

जहाल काही लिहून जाशिल आणिक तहकीक
धर्मांधांची फौजच येईल बघ मोर्चाला....

वाट नवी शोधताना

वाट नवी शोधताना......

एकदा संपू दे हे क्षण,
नंतर काय ते बघुयात.
आयुष्याच्या या पुस्तकात,
चल नवे धडे कोरूयात।।

काही हसरे,काही दुखरे,
क्षण सारे बिनधास्त झेलूयात,
सर्व काही झालेले विसरून,
आनंदाची नवी बाग फुलवूयात।।

नसे इथे कुणाशी वैर,
सारेच आपले जवळ करूयात।
हातात हात घेऊनी तव,
सोबत सर्व वाटेवरी चालूयात।।

न परका कुणी आपल्याला,
नाते घट्ट असे बांधुयात।
जन्मभर पुरतील असे मित्र,
साठवण म्हणून सारे जपुयात।।

बघा हा दृष्टिकोन जगण्याच्या,
शक्यतोवर आपण सगळेच पाळूयात।
सोडून भेद,अहंकार जागीच सारा,
चला बालपणीचे खेळ पुन्हा खेळूयात।।

Saturday, 30 April 2016

Freshman Semester 💐🙅😘🎊💝

First Semester

Syllabus जरा  ज्यास्त  दर सेमेस्टर ला वाटतो
chapter  पाहून  ग्रेड  चा प्रोब्लेम  मनात दाटतो

तरी lecture  सुरु असतात
 चित्र विचित्र  figure
कागदावर रेखाटत  जातात

विषयाची नावेच  लक्ष्यात  राहत  नाहीत
आणि नॉन क्रेडीट आम्ही  कुठच  मोजत नाहीत

तितक्यात  फ्रेशर जवळ येते
function, Festival Semester चे 
दिवस  चोरून घेते

नेमेके मन येथेच फसते
नजरेतला भाव कळता
गोड गोड हसते,

मिड  आम्हाला मग ताळ्यावर आणते
professor मग syllabus संपवु   पाहतात
दिवाळीच्या  सुट्ट्यात बार्गेनिंग करतात,

तरी  lecture सुरु असतात,
पण हात सुरु असतो  मन चालत नाही,
सरांशिवाय  वर्गात कुणीच बोलत नाही,,

लेक्चर  संपून आता सुरु होईल
submission चा खेळ
प्रक्टीकॅल बुक  complesion
मध्ये जाईल वेळ  




                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               

Thursday, 28 April 2016

मनात आले एक कविता करावी..

मनात आले एक कविता करावी...
साधी सरळ सोपी
कोणालाही समजेल अशी एक कविता करावी...

झाडावर किव्वा मातीवर करावी
फुलावर किवा फुलपाखरावर करावी
पानावरच्या दवावर किव्वा
त्याच्या सोनेरी किरणांवर करावी
मनात आले एक कविता करावी...!!१!!

कवितेत नको कोणी राजा आणि राणी
फक्त असावी मनाला भावतील अशी
गोड गोड गाणी
कोणीही आपलेपणाने सतत गुणगुणावी
मनात आले एक कविता करावी...!!२!!

कवितेत नसावे कोणी प्रियकर किवा प्रेयसी
त्यांच्या प्रेमाचे दु:ख किवा प्रेमाची रडगाणी
पण कोणीही प्रेमात पडावी अशी कहाणी असावी
कोणाच्याही मनात पटकन भरून
हृदयात खोल शिरावी
मनात आले एक कविता करावी...!!३!!

कवितेला असावा एक आपलेपणा
कधीही न संपणारा मायेचा ओलावा
कवितेत असावा प्राजक्ताचा सहवास
सुंदर उमलणाऱ्या रातराणीचा सुगंधी वास
प्राजक्ता असो की रातराणी
पटकन ओंजळीत धरून ठेवावी
मनात आले एक कविता करावी...!!४!!

कवितेत असावे पशु पक्षी झाडे वेली
आंब्याच्या झाडाला चंदनाच्या साली
सर्वकाही स्वप्नवत असले तरीही
वास्तवातील जीवनात तंतोतंत उतरावी
मनात आले एक कविता करावी...!!५!!

कवितेला असावे तिचेच मन
स्वच्छ निर्मळ मोत्यासारखे सुंदर
अबोल तरीही हिऱ्यासारखे अनमोल
कवितेला असावे तिचेच नाजुक हृदय
सतत मला बोलावणारे माझ्यासाठी धडधडणारे
कविताच नाहीतर ती माझी प्रेयसीही बनावी
मनात आले एक कविता करावी...!!६!!

जगात कितीतरी लोक कविता करतात
काही कविता स्मरतात तर काही
भूतकाळात विरतात
माझी कविता मात्र अनमोल ठरावी
आयुष्यभर पुरून उरावी
मनात आले एक कविता करावी...
मनात आले एक कविता करावी...!!७!!


कल्पनाशक्तीचा खून

वर्गात आल्या  बाई  मोठ्या घाईने 
 म्हणाली लिहा कविता डोक्याने ...

निळा आंबा पांढरा पेरू 
खाऊन पोट भरिले, 
लिहिलं आमच्या गोप्याने,
हे ऐकून सारे हसले, 
म्हणाले काय लिहिले हे मुर्खाने ...

“अरे मुर्खा, आंबा हा पिवळाच पेरू हे हिरवंच ”
  म्हणाली बाई रागाने 
“ का ? हे असंच का ? तसं का नाही ? ” 
विचारलं त्याने हट्टाने
म्हणाल्या बाई ,
“ हे असंच लिहिलंस,तरच पास होशील चांगल्या मार्काने ”
खरं तर त्यादिवशी कल्पनाशक्तीचा खून झाला 
कोणाच्या तरी हाताने .....

चित्रकलेच्या तासाला सर आले विषयाला
 म्हणाले काढा चित्र मनाने
त्रिकोणी सूर्य,उडणारे मासे, सहा पायी हत्ती, 
मस्त सृष्टी रंगवली गोप्याने 
हे बघून सारे हसले 

म्हणाले पुन्हा माती खाल्ली ह्या मुर्खाने...

“अरे बावळट,सूर्य गोलंच,मासे पाण्यातच, हत्तीला चारच पाय ”
म्हणाले सर रागाने 
“कोणी सांगितला ? माझ्या चित्रात हे असंच ” 
 म्हणाला गोप्या  जिद्दीने 
हात पुढे करताच बसले दोन फटके सरांच्या पट्टीने 
कल्पनाशक्तीचा खुन झाला,कोणाच्या तरी हाताने .....

दहा वर्षनंतर..

“ अरे गोप्या  तू ? काय चाललंय सध्या ? ” 
विचारलं त्यांनी आपुलकीने
“ काय चालणार ? तीच दहा  हजारची नोकरी ,
 तेच पत्र्याच  घर त्याला नहीं छप्पर” 
 म्हणाला गोप्या खजीलपणे..

“ अरे अरे अरे ! काय हे गोप्या  ? काय चाललंय हे ?
थिंक औट ऑफ द बॉक्स , वापर कल्पनाशक्ती , आणि मार भरारी आयुष्यात ”

 म्हणाली बाई उत्साहाने  हृदय भरून आले , 
केविलवाणे शब्द फुटले..
 
“ वापरली असती बाई, खरंच वापरली असती,
 पण तिचाच तर खून झालाता कोणाच्या तरी हाताने..

संपत नाही शक्ती गोप्या सांगितले  thermodynamic
ने सर बोलले पुढाकाराने
आनंद घे जगाचा तुझ्यामधल्या गुणाने
गोप्या  उठतो  निर्धाराने काहीतरी करण्याच्या उर्मिने

कल्पनाशक्तिचा खून झालता  कोणाच्या तरी हाताने ”.

जगाला शेती शिकवणारा दुर्लक्षित नायक : डॉ.पांडुरंग खानखोजे

  कृषिप्रधान भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंभू बनवणारे हरितक्रांतीचे जनक डॉ.स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच.असे अ...