आज खूप दिवसांनी लिहायला बसलोय तेही पहाटे 5 वाजता, नुकतच दुर्गाजय दत्ता च पुस्तक वाचलं "The Boy Who Loved" वेगळंच वाटतंय...एकदम रोमॅन्टिक ! सर्व भूमिका आणि चरित्राची अगदी सुबोध वर्णन केलंय अगदी हळवं झालंय मन, खुप भावना दाटुन आल्यात वर पाऊस टीप टीप पडतोय वातावरणात एक गारवा आणि पहाटेची किलबिल मोहक शांतता यासोबतीला उन्मुक्त अभिव्यक्ती. सडेतोड आत्मपरीक्षण..वेदनांची हळुवार उकल.. आणि समोरच्याच्या साथीने आपल्या स्वतःलाच सापडलेले आपण! फार सुंदर अनुभव होता, खरंतर कुणा दुसऱ्यासाठी घेतलेलं हे पुस्तक इतकं आवडेल अस वाटलं देखील नव्हतं , आता लक्षात येतंय किती हद्दपार केल्यात काही गोष्टी आपल्यातून. ‘माझ्या’ माणसाला मनातलं काही सांगताना मोबाईलचा स्क्रीन वर टिपटिप करण्यात नुसताच वेग साधतो.
धावणारे विचार काबूत आणून कागदावर उतरवंताना मजेदार तारांबळ उडते, ती सरावाने ‘प्रोग्राम्ड’ मेंदू अगदी सहज उरकून टाकतो. हरवलेला आहे प्रत्यक्ष स्पर्श. ‘पर्सनल टच’.आपल्या प्रिय व्यक्तीची भेट कधी होईल माहिती नाही. भेट काय, तिचं दर्शनही अप्राप्य आहे. पण संवाद तर साधायचाच आहे 'या मनीचे त्या मनी' घातले नाही, तर ते अपूर्णत्व आपल्याला चरितं करणार आहे. ही सैरभैर करणारी ओढ. कधीकधी अपूर्ण गोष्टी असतात ना, त्या भासतात. पूर्णत्वाचं समाधान नसेलही त्यांच्यात कदाचित. पण अर्ध्यात वेगळ्या झालेल्या त्या वाटा धुक्यासारख्या भासतात. गूढ..पण सुंदर.😊
Saturday, 26 May 2018
अपुर्णत्व
Subscribe to:
Post Comments (Atom)
जगाला शेती शिकवणारा दुर्लक्षित नायक : डॉ.पांडुरंग खानखोजे
कृषिप्रधान भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंभू बनवणारे हरितक्रांतीचे जनक डॉ.स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच.असे अ...
-
मी आठवीत असतानाची गोष्ट असेल. आमच्या batch मधून 4 विद्यार्थी NTSE mains साठी सिलेक्ट झालो होतो. (ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा असून दहावी श...
-
Fail? ? ? "Oh, on, you should not say like this" Is this what you are feeling, after looking at this title? If so, don't wor...
No comments:
Post a Comment