प्रत्येकाला काही न काही अडचणी असतात. कोणी बोलतं, कोणी बोलत नाही. कोणी आपापले मार्ग आपणच शोधतात, कोणी इतरांना विचारतात.
पण ह्या सगळ्या प्रोसेस मधे सोबत कोणीतरी हवं असतं. नेहमी सगळा प्रॉब्लेम शेअर केला जाईल असही नाही. पण नुसतं बोलायला, व्हेंट आऊट व्हायला हवं असतं.
कधी माहिती - मदतहवी असते. या सगळ्यामधे प्रत्येकाच्या कॉंट्रीब्युशन असते, असावी लागते. कधी नुसतं एेकून घ्यायची, कधी सल्ले देण्याची,
*टर्न बाय टर्न हे प्रत्येकानं केलं तर गृप घट्ट होत जातो*
कधी एखादीला सतत माहितीच हवी, ती मात्र इतरांच्या मदतीला येत नाही, असं झालं की मग हा बंध सैल होऊ लागतो. सतत एकीलाच पँपर करत रहाणं हेही काही फार संयुक्तिक नाही.
तसच कधीतरी तुमची चूक दाखवली जाऊ शकते हेही लक्षात घ्यायला हवं.
तर कधी कोणीच मदतीला येऊ शकत नाही हेही समजून घेतलं पाहिजे.
प्रत्येकाचं मत वेगळं, अनुभव वेगळा, स्वभाव वेगळा,... हे प्रत्येकानेच समजून घ्यायला हवं.
आणि समजा एखाद्याला नाही समजलं एखाद वेळेस तर ते सोडूनही देता आलं पाहिजे.
सर्वात महत्वाचे म्हणजे गृप मधून बाहेर पडताना, नीट सांगून बाहेर पडायला हवं. परतीची वाट ओपन ठेवा.
हे सगळं लिहितोय ते खर तर माझं मलाच सांगतोय. सो नो ऑफेन्स प्लिज
No comments:
Post a Comment