तुला मिठीत घ्यायला
मला ' आवडणार ' नाही...
आवडत नाही असे कुणी सांगितले ?
तसे फार वेळा मनात येते
पण मग तिथे गोष्टी संपत नाहीत
मिठी संभाषणासारखी असते
आधी साधत नाही
मग कधी संपत नाही
आता त्या न संपणाऱ्या न घडणाऱ्या
संवादाचे काय करावे?
मिठी रेंगाळनार्या संवादात
'इत्यादी' असतोच ना
तसे तू मिठीचे करून टाकतेस
इत्यादी इत्यादी घुसमटनारे इत्यादी
दिघ:मूढ इत्यादी शब्द,स्पर्श,व्याकुळ ,
इत्यादी इत्यादींच्या अनेक तऱ्हां......
इत्यादींची मला भीती वाटते
तुलाही वाटते
तुझीही वाटते
इत्यादी भीती वाटण्यासाठीच असतात
किंवा निरर्थकमध्येच
केंव्हा तरी
माझ्याकडे वळणार्या
तुझ्या आतुर नजरेसारखी
ती निरर्थक असते !!!
असे नव्हे ,
पण कदाचीत तसेच असते
कारण ती इत्यादी असते
इत्यादी म्हणले तर अर्थपूर्ण असतात
म्हणले तर निरर्थक
मग कुणी म्हणले तर......
इत्यादी,इत्यादी........
(तहकीक ऋषिकेश रवींद्र)
No comments:
Post a Comment