BROKEN WORDS

कविता इथेच संपल्याचं 
मधेच कऴल्यावर 
पुढल्या सगळ्या ओळी 
खोडतांना
आठवत राहातात
अनेक संबंध 
ज्यांच्यातलं कवित्व संपलं होतं
कधीच पण
लिहित राहिलो होतो 
त्यांच्याअनावश्यक ओळी आपणच
अपरिहार्यपणे
कागदावरल्या ओळी 
कापता तरी आल्या 
पण संबंधांना तसंच ठेवलं तरंगत 
आपण निर्दयपणे 
वेगवेगळ्या कवितांच्या
गल्ल्यांतून चकवा लागल्यात
पुन्हा पुन्हा पोहोचलो 
त्याच हमरस्त्यांवर तरी संबंधांवरली शीर्षकं कायमची खोडता नाही आली
आपल्यालाआणि चांगल्या ओळी 
वेगळ्या काढून 
संबंधही Re write करता आले नाही 
अज़ून नशेत लिहिलेल्या
कित्येक ओळिंचे संदर्भदुसर्या दिवशी लागता लागले नाहीत 
किंवा खपली खालच्या साकळल्या 
ओळीही भळभळल्या नाहित 
कधीच तरी संबंधांचे 
व्रण मात्र कायमचे उठतच राहिले आपल्यावरआता
कधीतरी 
आज़वर कापलेल्या ओळी 
आणि 'उगाच' वाढलेल्या संबंधांना 
"मांज़रीचं" गोंडस् पिल्लू 
समज़ून अंधार्या पठारावर यायला हवं सोडून
आपापल्या पायांवर 
त्यांनी स्वताःच 
शेवटी मोठं व्हायला हवं म्हणून....!!

Comments

Popular Posts